हा न्यायालयाचा अधिकार.., अजित पवारांची प्रतिक्रिया

हा न्यायालयाचा अधिकार.., अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना वकीलांमार्फत बाजू मांडत आहे, निर्णय काय येणार? हा न्यायालयाचा अधिकार असून मी यावर भाष्य करणार नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे, तसेच भविष्यामध्ये राजकीय लढाईचे काय तंत्र ठेवावे, याविषयी चर्चा झाली असून सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे, त्यामुळे आमच्या बाबतीत अपप्रचार सुरू केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत, मात्र त्यांच्या आदेशानेच बैठक घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

अमरावती नागपूर शिक्षक पदवीधर निवडणूकबाबत आज चार वाजता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत आमची चर्चा होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. जातीय आधारावर लोकसंख्या किती आहे हे सर्वांना कळली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने केली होती.

आधी दोन न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर न्यायालयानं विनंती मान्य केल्यास सात न्यायमूर्तींचं बेंचसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, सत्तासंघर्षाबद्दल न्यायालयाने काय निर्णय घ्यायचा तो न्यायालयाचा अधिकार असून मी यावर भाष्य करणार नसल्याचं त्यांनी म्हंटलंय. त्यामुळं आता पुढील सुनावणीला काय होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube