राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेस मैदानात उतरणार पण आघाडीचा धागा सुटणार? थोरातांच्या वक्तव्याने राजकीय समीकरणे ढवळली!

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीत योग्य वेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (7)

Thorat’s statement stirred political debate : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या लढतीत जोरदार एंट्री केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीत योग्य वेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या माजी आमदार प्राजक्ता तनपुरे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या चर्चांनी समीकरणे आणखी गुंतागुंतीची केली आहेत

यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी तनपुरे संपर्कात नसल्याचे सांगत थेट भाष्य टाळले. त्यामुळे काँग्रेसचा पुढील निर्णय काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान, राहुरीतील ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून आघाडीतील एकजूट की अंतर्गत मतभेद याचीही खरी कसोटी ठरणार आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या लढतीचे खरे चित्र समोर येणार आहे.

follow us