आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?
Today’s Horoscope September 5 चंद्राच्या वृषभ राशीतील भ्रमणाचा मेष ते मीन राशींवर कसा परिणाम होईल, कोणत्या धनलाभ आणि कोणाला सावध राहावे लागेल.
Today’s Horoscope September 5 : शनिवारचा दिवस सर्वच राशींसाठी वेगवेगळे अनुभव घेऊन येणार आहे. आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करत असून त्याचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव पाहायला मिळेल. काही राशींना आर्थिक लाभ आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना आरोग्य, मानसिक ताण किंवा कौटुंबिक मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया, आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका कसा असेल?
‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
मेष
आज चंद्र वृषभ राशीत असल्याने तुमच्या राशीपासून तो दुसऱ्या भावात आहे. संयमी आणि समाधानी दृष्टिकोन ठेवल्यास आज वादविवाद टाळता येतील आणि तुमच्यासह समोरच्या व्यक्तीचेही हित साधता येईल. लेखक, कलाकार आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. भावंडांशी जवळीक वाढेल. मात्र, दुपारनंतर काही चिंता मनावर येऊ शकतात आणि उत्साह कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवासाचे नियोजन होईल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.
वृषभ
चंद्र आज तुमच्या राशीतच असल्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढलेला राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही प्रसन्न वाटेल. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. मात्र, दुपारनंतर निर्णय घेताना संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि एखादी चांगली संधी हातातून जाऊ शकते. हट्टीपणा टाळणे हिताचे ठरेल. शक्य असल्यास महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
शेजारचे राज्य कर्नाटक पाडणार कृत्रिम पाऊस; आपले सरकार काय निर्णय घेणार ?
मिथुन
आज चंद्र तुमच्या राशीपासून बाराव्या भावात असल्याने दिवस काहीसा चढ-उताराचा राहू शकतो. आरोग्याबाबत किरकोळ तक्रारी जाणवू शकतात आणि मनात चिंता राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या. दुपारनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि उत्साह पुन्हा वाढेल. कौटुंबिक वातावरणात सकारात्मक बदल जाणवतील. आर्थिक लाभाचीही शक्यता आहे.
कर्क
चंद्र लाभस्थानात असल्यामुळे दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. कुटुंब आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या महिलेच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. प्रिय व्यक्तीची साथ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्यही उत्तम राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर विनाकारण चिंता वाढू शकते. घरातील वातावरण काहीसे तणावपूर्ण होऊ शकते. काही कामे अपूर्ण राहतील आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत; सतेज पाटलांचा घणाघात, शक्तीपीठावरूनही सरकारला घेरलं
सिंह
आजचा दिवस सिंह राशीसाठी आनंददायी आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होऊन आर्थिक फायदा मिळू शकतो. मित्र आणि कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या महिलेच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्यता आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. छोट्या प्रवासाचे योग आहेत. वैवाहिक जीवनातही सुख-समाधानाचे वातावरण राहील.
कन्या
आज परिस्थिती तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी किंवा व्यवसायातील जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्या प्रभावीपणे हाताळता येतील. दुपारनंतर नवीन कामांचे नियोजन यशस्वी होईल आणि प्रलंबित कामांनाही गती मिळेल. व्यापारात विस्ताराची संधी मिळू शकते. कुटुंबातील आपुलकी वाढेल आणि सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
तूळ
चंद्र अष्टम भावात असल्याने दिवसाची सुरुवात काहीशी आव्हानात्मक राहू शकते. आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नवीन काम सुरू करताना अडथळे येऊ शकतात. कामाचा वाढलेला ताण मानसिक अस्वस्थता निर्माण करू शकतो. प्रवासातही काही अडचणी संभवतात. मात्र, दुपारनंतर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. कामांना वेग येईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून नवीन काम हाती घेता येईल.
वृश्चिक
आज चंद्र तुमच्या राशीपासून सातव्या भावात असल्याने दिवसाची सुरुवात उत्साहपूर्ण राहील. शारीरिक ऊर्जा आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेता येईल. मात्र, काही कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाहीत. प्रवासात अडथळे किंवा गैरसोय होऊ शकते. अशावेळी अध्यात्म, प्रार्थना आणि ईश्वरभक्तीमुळे मानसिक शांतता मिळण्यास मदत होईल.
पिकं करपली, चारा संपला; मराठवाड्यात शेतकऱ्यांवर उभ्या पिकात जनावरं सोडण्याची वेळ
धनु
आजचा दिवस उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला राहण्याची शक्यता आहे. नियोजनानुसार कामे पूर्ण होतील आणि रखडलेली कामेही मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रवासाचे नियोजन होऊ शकते. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून परदेशात असलेल्या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी मिळू शकते.
मकर
आज केलेल्या मेहनतीचे अपेक्षित फळ लगेच मिळेलच असे नाही; मात्र कामाप्रती तुमची निष्ठा कायम राहील. इतरांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ टाळणे फायदेशीर ठरेल. दुपारनंतर अपूर्ण कामे पूर्ण होऊ लागतील आणि आरोग्याशी संबंधित त्रासही कमी होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महिलांना माहेरकडून चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
कुंभ
आज आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे व्यवस्थित पूर्ण करता येतील. आर्थिक व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. विचारांमध्ये अधिक परिपक्वता येईल. मेहनतीच्या तुलनेत अपेक्षित यश कमी मिळाले तरी काम योग्य पद्धतीने केल्याचे समाधान मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार! कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने
मीन
आज मनावरील काही चिंता दूर झाल्याने हलके आणि प्रसन्न वाटेल. उत्साह वाढेल आणि कौटुंबिक तसेच आर्थिक बाबींवर अधिक लक्ष देता येईल. आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी काही खर्च करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष चांगला असून अभ्यासात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.