नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हेंची हत्या, एनआयएचा खुलासा

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हेंची हत्या, एनआयएचा खुलासा

अमरावती : येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात एनआयएकडून 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती, असा मोठा खुलासा एनआयएकडून करण्यात आलाय.

एनआयएकडून सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने उमेश कोल्हेंची हत्या केली, तो तबलिगी जमातचा होता आणि पूर्णपणे कट्टरपंथी होता. सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद त्याला भडकावायचे. कोल्हेंचे अमरावतीमध्ये मेडिकल स्टोअर होते. 21 जूनच्या संध्याकाळी तिघांनी मिळून त्यांची हत्या केली. ते घरी परतत असताना वाटेत हल्लेखोरांनी त्यांना घेरून हत्या केली. कोल्हे यांची सून व मुलगा दुसऱ्या दुचाकीवर होते. त्यांनी कोल्हेंना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं.

एनआयएच्या सांगण्यावरुन, आरोपी आधीच कोल्हेंचा पाठलाग करत होते आणि ते फक्त संधी मिळण्याची वाट पाहात होते. शुक्रवारी एनआयएनं 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. त्यात उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामीने केल्याचा दावा एजन्सीकडून करण्यात आलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube