America Iran Conflict : अमेरिका – इराण पुन्हा संघर्ष पेटला; क्यूशम बेटावर अमेरिकेचा हल्ला

America Iran Conflict : अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर मोठा हल्ला केला आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या

  • shakir sayyad
  • Written By: Published:
America Iran Conflict

America Iran Conflict : अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर मोठा हल्ला केला आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला इराणच्या ‘केशम बेटा’ (Qeshm Island) वर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या या हल्लानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण दरम्यान संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकन (America) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आली. हा निर्णय अशा उद्देशाने घेण्यात आला असावा, जेणेकरून व्यापक संघर्षाची सुरुवात होत असल्याचे संकेत मिळू नयेत. या हल्ल्यानंतर बेटावर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

तर दुसरीकडे सोमवारी, आपल्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प (Donald Trump) यांनी दावा केला होता की, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 10 डॉलर्सपर्यंत खाली आल्या आहेत आणि याच कारणामुळे इराण आता करार करण्यास उत्सुक आहे. त्यांनी लिहिले की, तेलाच्या किमतीत झालेली ही विक्रमी घसरण बाजारातील या अपेक्षेमुळे झाली आहे की, इराणसोबत (Iran) कोणतेही युद्ध होणार नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले की, इराण करारासाठी उत्सुक आहे आणि असा करार होणे नक्कीच शक्य आहे.

राष्ट्रवादीत पुन्हा वाद, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ नेत्यांची नाराजी; सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेणार? –

तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

केशम बेटावरील हल्ल्याच्या वृत्तानंतर, मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. या हल्ल्यामुळे आठ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे पश्चिम आशियातून होणारा तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. मंगळवारी ‘ब्रेंट क्रूड’च्या किमतीत 48 सेंटची वाढ होऊन ती प्रति बॅरल 105.25 डॉलर्सवर पोहोचली, तर अमेरिकेच्या ‘वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट’ (WTI) क्रूडच्या किमतीतही वाढ होऊन ती प्रति बॅरल 96.93 डॉलर्सवर पोहोचली.

follow us