विदर्भ आणि मराठवाडा सुजलाम-सुफलाम होणार, कसे असतील नदीजोड प्रकल्प?
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. या शिवाय, नदीजोड प्रकल्पाविषयी देखील अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली. राज्यात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सगळीकडे पाणी पोहचवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. यात पाच नदीजोड प्रकल्पांचा (river linking projects) समावेश आहे.
या नदीजोड प्रकल्पांचा कोणकोणत्या भागाला लाभ होणार आहे, याबद्दल फडणवीस यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ होणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत पाणी नेता येईल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यामुळे विदर्भ सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
नदीजोड प्रकल्प कसे असतील?
– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
– नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार
– मुंबई, गोदावरी खोऱ्यातील तुट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
– मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रतातील नाशिक, नगर, जळगावला लाभ होणार
– वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ
राज्यात मान्सूनच्या काळात नद्यांना पूर येतात. राज्याच्या एकूण पाण्याच्या 65 टक्केच पाणीच वारपले जाते. उरलेले पाणी वाहून जाते. याऐवजी नद्या एकमेकांना जोडल्यास पाण्याचा जास्तीत जास्त वापर करता येणार आहे. नदीजोड प्रकल्पाच्या प्रक्रियेत जास्त पाणी असलेली नदी, कमी पाणी असलेल्या नदीसोबद जोडली जाते. या नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ तसेच पूरस्थितीचे संकट कमी होईल. दरम्यान, या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ, मराठवाड या सारख्या दुष्काळी भागांसाठी प्रगतीचे दरवाजे खुले होतील.