Video : फडणवीसांसमोर ‘विजय’ फिका पडला; मुख्यमंत्र्यांच्या ‘रॉयल’ बुलेट स्वारीवर सदावर्ते फिदा
CM Fadnavis Bullet Ride राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'धडाकेबाज' एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.
Adv. Gunaratna Sadavarte On CM Fadnavis Bullet Ride : राज्याच्या राजकारणात सध्या एका ‘धडाकेबाज’ एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. इंधन बचतीचा सामाजिक संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.14) चक्क स्वतः बुलेट चालवत विधानभवन गाठले. त्यांच्या या अनोख्या स्टाईलवर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या खास शैलीत दाद दिली असून, “फडणवीसांसमोर ‘विजय’ फिका पडला,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानभवनात बुलेटवर रॉयल एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री स्वतः बुलेट चालवत होते आणि त्यांच्या मागे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी इंधन बचतीचा हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून यामुळे अनेक फायदे होतील असे सांगितले. यावेळी त्यांनी जपानमध्ये अनेक मंत्री पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री बाईकवर आणि नितीन गडकरी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत आहेत, हे पाहून आनंद वाटत आहे.
‘डंके की चोट पर’ स्टाईल
काल मुख्यमंत्र्यांची काय स्टाईल होती, ते कॉलेजला जात होते की विधानभवनात? डंके की चोट पर मस्त…” अशा शब्दांत सदावर्तेंनी मुख्यमंत्र्यांच्या लूकचे कौतुक केले. एवढ्यावरच थांबतील ते सदावर्ते कसले फडणवीसांच्या बुलेट सवारी समोर तामिळनाडुतला ‘विजय’ देखील फिका पडला आहे, असेही सदावर्ते मिश्किलपणे म्हणाले.
कॉलेजला जात होते की विधानभवनला? फडणवीसांसमोर 'विजय' फिका पडला; मुख्यमंत्र्यांच्या 'रॉयल' बुलेट स्वारीवर गुणरत्न सदावर्ते फिदा #SaveFuel #Modi #DevendraFadnavis pic.twitter.com/kix4qmc0RX
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 15, 2026