Weather Update : विदर्भात पारा 45 अंशांवर, पुढील 5 दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार

Weather Update : विदर्भात पारा 45 अंशांवर, पुढील 5 दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार

Weather Update in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील 17 आणि विदर्भात 9 जिल्ह्यातील पारा चाळीशी पार गेला आहे. तर अकोल्यामध्ये 45 अंश तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान पुढील पाच दिवस हा उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mocha Cyclone : मोखा चक्रीवादळाने धारण केलं रौद्ररूप, किनारी भागाला सतर्कतेचा इशारा

दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये 36.3 अंश तापमान नोंदवलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube