Weather Update : राज्यात हुडहुडी! ‘या’ भागात मात्र पाऊस लावणार हजेरी

Weather Update : ऐन थंडीत पाऊसधारा! आज 'या' भागात पाऊस लावणार हजेरी

Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) राज्यातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील तापमानात मोठी घट झाली असून गारठा वाढला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. या ठिकाणी जर आता पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert : अवकाळी संकट कायम; 4 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

24 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तसेच 25 आणि 27 नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस  होईल. शेतकऱ्यांनी फळबाग, भाजीपाला, फूल पिकांची काळजी घ्यावी. काढणीला आलेली पिके काढून घ्यावीत. तसेच आपल्याकडील पशुधनाचीही या दिवसात काळजी घ्यावी. या दिवसात पाऊस झाला तर पिकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यासह देशातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळ, अंदमान निकोबार बेटे, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल या भागात पाऊस झाला. त्यानंतर आता पुढील 24 तासांत कोझिकोड, तिरुवनथपूरम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर, नागपट्टिनम, थुथुकुडी, कराईकल या भागात पावसाची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत देशभरात तापमानात मोठी घट झाली आहे.

Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार

दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या दिवसांत पाऊस होत नाही. पिके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले होते. आताही हवामान विभागाने आणखी मराठवाड्यात अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. पुढील चार दिवसांत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Tags

follow us