Ganesh Festival 2023 : देशातील एकमेव स्वयंभू निद्रिस्त गणेशमूर्ती तुम्ही पाहिली का? अशी आहे मनोरंजक कथा

  • Written By: Published:
Ganesh Festival 2023 : देशातील एकमेव स्वयंभू निद्रिस्त गणेशमूर्ती तुम्ही पाहिली का? अशी आहे मनोरंजक कथा

अहमदनगर : सध्या गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु असून ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांची देव दर्शनसाठी मोठी गर्दी होत आहे. गणपतीचे अनेक रूपे तुम्ही आजवर पहिले असतील. गणेशाची उभी मूर्ती तसेच पाटावर बसलेली मूर्त्या तुम्ही पहिल्या असतील. मात्र गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती पहिली का? नाही ना… पण, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असे निद्रिस्त गणेशाचे मंदिर (Temple of Sleeping Ganesha) हे नगर (Ahmednagar) जिल्ह्यात आहे. नगर शहरापासून जवळपास 60 किमी अंतरावर शेवगाव तालुक्यातील आव्हाने बु. येथे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. नेमकी या गणरायाची आख्यायिका काय आहे? त्याच विषयी जाणून घेऊ.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

असं म्हणतात की देशातील ही गणरायाची निद्रिस्त अवस्थेतील एकमेव मूर्ती आहे. ती सुमारे ५०० वर्ष जुनी असल्याचं सांगितल्या जातं. महाराष्ट्रात अशी दुर्मिळ मूर्ती अन्यत्र कुठंही नाही. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेलल्या मोरगावच्या गणपतीचे अंशात्मक स्थान म्हणून हा गणपती ओळखला जातो. ही अतिशय दुर्मिळ मूर्ती असल्यानं राज्यभरातील भाविकांमध्ये मूर्तीविषयी आकर्षण आहे.

जाणून घ्या आख्यायिका
या गावात खूप वर्षांपूर्वी दादोबा देव नावाचे गणपतीचे भक्त राहात होते. दरवर्षी ते न चुकता मोरगावची वारी करायचे. वय झाले मात्र तरीही त्यांनी आपली वारी कायम ठेवली. ते वारीला निघाले वाटेत असलेल्या ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर ते लांब वाहत गेले. वाटेत आलेल्या एका बेटावर ते थांबले असता, तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की मीच तुझ्या गावी येतो.

KG George passed away : प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन 

कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेती नांगरत असतांना त्याला जमिनीत एक स्वंयभू गणेशमूर्ती मिळाली. ती मूर्ति म्हणजेच निद्रिस्त गणपती मूर्ती. अशी या मूर्तीची कथा आहे. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते.

जमिनीपासून तीन फूट खोल गणपतीची मूर्ती
आव्हाने येथील मंदिरात असलेली गणेशाची मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल आहे. तिची लांबी सव्वातीन फूट तर रुंदी दोन फूट आहे. हा पूर्वाभिमुख गणेश उजव्या सोंडेचा आहे. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. श्रीगणेशाची सध्या भालेराव घराण्यामार्फत पूजा केली जाते व विविध उत्सवही साजरे केले जातात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube