गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स; बंटी पाटलांनी महायुतीसमोर पदर का पसरविला ?

Gokul: काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी बाजी मारली.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Satej Patil

Gokul President Election : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या (Gokul) निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी महायुतीला धोबीपछाड दिली. पण समविचारी आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. 25 पैकी समविचारी आघाडीचे 13, तर महायुतीचे बारा संचालक निवडून आले आहेत. गोकुळमध्ये बहुमत असून, अध्यक्षपदाचा पेच का निर्माण झाला ? सतेज पाटलांना महायुतीच्या नेत्यासमोर पदर का पसरावा लागत आहे ? दोन्ही बाजूचे संचालक सहलीवर का पाठविण्यात आले आहे हे जाणून घेऊया…

यंदाची गोकुळची निवडणूक प्रचंड गाजली. गोकुळ ताब्यात घेण्यासाठी महायुतीने सर्व शक्तीपणाला लावली होती. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नेते एकवटले होते. महायुतीतील तिन्ही पक्षाचे दहा आमदार, दोन खासदार अशी ताकद असताना, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी बाजी मारली. आता गोकुळच्या अध्यक्षाची येत्या गुरुवारी निवड होणार आहे.


पुण्यात 25 हून अधिक जणांचं पोलीस संरक्षण काढलं; राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांना मात्र अभय

त्याआधी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्यात. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून बंटी पाटील यांनी आपले नवनिर्वाचित संचालक सहलीवर पाठविलेत. तर महायुतीच्या नेत्यांनीही आपले संचालकही एकत्र ठेवलेत. बंटी पाटील यांनी आपले संचालक हे कर्नाटकात सहलीवर पाठविलेत. तिथे एक रिसॉर्टमध्ये ते थांबलेले आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून, त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून हे सुरक्षित ठिकाण निवडण्यात आलेले आहेत. तर महायुतीचे संचालक गोव्यात सहलीवर गेलेत.

बहुमत असले तरी कायदेशीर पेच
गोकुळमध्ये सतेज पाटील गटाकडे 13 जागांचे स्पष्ट बहुमत आहे. तरी अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेसाठी एक तांत्रिक अडचण निर्माण झालीय. गोकुळच्या पोटनियमांनुसार अध्यक्ष निवडीची सभा वैध ठरण्यासाठी एकूण 25 संचालकांपैकी किमान 50 टक्कांपेक्षा जास्त म्हणजेच 14 संचालकांचे कोरम आवश्यक आहे. सतेज पाटलांना एक संचालक कमी पडत आहे. त्यामुळे सभा कायदेशीररित्या पार पाडण्यासाठी त्यांना विरोधी महायुतीच्या किमान एका संचालकाची बैठकीला उपस्थिती आवश्यक आहे. आमदार बंटी पाटील यांनी गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची घोषणा निवडणुकीच्यावेळीच जाहीर केलीय.

‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

सतेज पाटील महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात
गोकुळवर आपला अध्यक्ष बसविण्यासाठी सतेज पाटील हे महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रदीप नरके यांना सतेज पाटील यांनी संपर्क साधला आहे. पाटील यांनी महायुतीतील नेत्यांशी संपर्क साधत संचालकांना बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करण्याची विनंती केलीय. मात्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक हे फोन उचलला नसल्याचे पाटील यांनीच सांगितलय. बहुमत मिळून बंटी पाटलांना अध्यक्ष करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांसमोरच पदर पसरविण्याची वेळ आलीय.


महायुती काय निर्णय घेणार ?

गोकुळमध्ये काय निर्णय घ्यायचा हे महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय. तसे झाल्यास गोकुळच्या निवडणुकीप्रमाणे अध्यक्षपदाची निवडणुकीतही ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अशा वेळेस पुन्हा सतेज पाटलांची कसोटी लागणार हे नक्की.

follow us