नगर-पुणे हायवेवर कर्डिले-सातपुते समर्थकांचा थरार, दोन्ही गटांकडून परस्परावर दगडफेक

नगर-पुणे हायवेवर कर्डिले-सातपुते समर्थकांचा थरार, दोन्ही गटांकडून परस्परावर दगडफेक

अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) काल (मंगळवारी) रात्री उशिरा भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) समर्थक परस्परांशी भिडले. दोन्ही गटांकडून दगडफेक झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे देखील वाचा
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला

अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात पाच वर्षांनंतर पुन्हा दोन गटांचा राजकीय थरार पहायला मिळाला. पूर्व वैमनस्यातून काल रात्री कर्डिले गट व सातपुते गट यांच्यात अहमदनगर-पुणे महामार्गावरील रंगोली हॉटेल समोर जोरदार दगडफेक झाली.

यावेळी महामार्गावर वाहतूक सुरू होती. ही घटना समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्हीही गट परस्परा विरोधात गुन्हे दाखल करावे यासाठी रात्रभर कोतवाली पोलीस ठाण्यात बसून होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube