राजकीय पोळी भाजू नका; जिल्हा विभाजनावर विखेंचे थेट उत्तर, पण राम शिंदेंना विभाजन हवे !

  • Written By: Published:
राजकीय पोळी भाजू नका; जिल्हा विभाजनावर विखेंचे थेट उत्तर, पण राम शिंदेंना विभाजन हवे !

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर जिल्हा विभाजनाचा प्रश्न आता तापू लागला आहे. जिल्ह्याचे विभाजन होऊन मुख्यालय श्रीरामपूरला होण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर बंदही ठेवण्यात आले आहे. जिल्हा विभाजनाबाबत माजी पालकमंत्री, आमदार राम शिंदे (Ram Shinde) व पालकमंत्री, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे मते स्पष्टपणे समोर आले आहे.( revenue-minister-radhakrishna-vikhe-on-district-sepration)

श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे यांनी स्पष्टपणे मत मांडले आहे. विखे म्हणाले, सध्या जिल्हा विभाजनाचा कोणताही विषय नाही. जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना सर्व बाबी तपासून निर्णय होतील. सध्या श्रीरामपुरात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा कुटील डाव काही राजकारणी करत आहेत. काहींचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचा टीकाही विखे यांनी केली आहे.

‘ते’ अजूनही पोरकट, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याची शरद पवारांनी उडवली खिल्ली

तर जामखेड येथील पक्षाच्या कार्यक्रमात आ. राम शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्हा विभाजन झाले पाहिजे, असा माझा कायम आग्रह राहिलेला आहे. मी पालकमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु सरकार बदलले त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. जिल्ह्याचे विभाजन व्हावे हे उत्तर व दक्षिण भागाची मागणी आहे.

‘स्टंटबाजी करू नका’; श्रीरामपूर बंद ठेवणाऱ्यांना राधाकृष्ण विखेंनी सुनावले !

महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जिल्हा विभाजनास पाठिंबा आहे. त्यांनी पुढाकार घेतला तर विभाजनाचा प्रश्न सुटू शकतो. परंतु त्यासाठी योग्य वेळ, योग्य ठिकाण पाहिजे. तर जिल्हा विभाजन होऊ शकतो व त्यादृष्टीने अंमलबजावणी होईल. विखे यांच्या कार्यकाळात जिल्हा विभाजनाचा प्रश्न निकाली ते काढतील, अशी आशा असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय विखे यांनी मंजूर आणले आहे. त्यावरून आता जिल्हा विभाजन होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर आता वेगवेगळे मते राजकीय नेते व्यक्त करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube