अहमदनगरच्या नामांतराबाबत राज्य सरकारच्या हालचाली

  • Written By: Published:
अहमदनगरच्या नामांतराबाबत राज्य सरकारच्या हालचाली

अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत शिंदे-भाजप सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने नगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवण्यात आल्याने अहमदनगर महापालिकेतील अधिकारी गोंधळून गेले आहेत. महापालिका अधिनियमात असा कोणताही ठराव करण्याची तरतूद नाही. तसंच अहमदनगर जिल्हाचे नाव बदलणे हे महापालिकेच्या अखत्यारित येत नसतानाही सरकारने ठराव मागितला आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यावा, या पेचात महापालिका प्रशासन सापडले आहे.

नामांतराबाबत महासभा घेऊन ठराव पाठविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नामांतराचा विषय महासभेत ठेवण्याची भूमिका घेतली आहे. अहमदनगर महापालिकेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. नामांतरावरून शहरात दोन राजकीय गट तयार झाल्याचे चर्चा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube