दहीहंडी संपल्यावर डोक्यात रॉड पडला; महिलेचा दुर्दैवी मृत्यू, पोलिस तक्रार करण्यास नकार!
Dahi Handi Celebration पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवानंतर रॉड डोक्यावर पडल्याने 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Tragedy Strikes Pune’s Old Sangvi After Dahi Handi Celebration: राज्यात सर्वत्र दहीहंडी जल्लोषात साजरी होत असताना पुण्यातील जुन्या सांगवी भागात एक दुर्दैवी घटना घडली. दहीहंडीचा उत्सव (Dahi Handi Celebration) संपल्यानंतर मंडपाचा लोखंडी सांगाडा उतरवताना झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. जुन्या सांगवीतील लेन क्रमांक 2 येथे ही घटना घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय 45 ) असे मृत महिलेचे नाव आहे.
‘या’ दिवशी लॉन्च होणार अॅप्पलचा iPhone 18 Pro, किंमत, फिचर्स अन् जाणून घ्या सर्व काही…
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम रात्री दहाच्या सुमारास पार पडला. त्यानंतर मंडप आणि कमानीचे लोखंडी स्ट्रक्चर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. याचवेळी सलमा पठाण आणि त्यांचे पती सलाउद्दीन पठाण तेथून घरी जात होते. मंडपाची कमान उतरवली जात असताना लोखंडी रॉड अचानक खाली पडला आणि सलमा यांच्या डोक्यावर आदळला.
महिन्याला 4 लाख पगार, अडीच लाखांची बचत, तरीही मूल नको; होम लोन कपल्सच्या आनंदावर विरजण?
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत सांगवीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी माहिती दिली. “दहीहंडी फुटल्यानंतर काही वेळातच मंडप उतरवण्याचे काम सुरू झाले होते. सलमा पठाण आणि त्यांचे पती तेथून जात असताना त्या कमानीजवळ आल्या आणि लोखंडी रॉड त्यांच्या अंगावर पडला,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मृत महिलेचा मुलगा रहीम पठाण हा संबंधित मंडळाचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पठाण कुटुंबीयांनी या घटनेप्रकरणी सध्या कोणतीही पोलीस तक्रार देण्यास नकार दिला आहे. “हे आमचेच मंडळ असून मंडळातील कार्यकर्ते आमच्या परिचयाचे आहेत,” अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासात काही वेगळे निष्पन्न झाल्यास त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
दरम्यान, साउंड सिस्टीम अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची चर्चा चुकीची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. साउंड सिस्टीम पडलेली नसून मंडपाची कमान उतरवताना लोखंडी रॉड खाली पडल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.