Abdul Sattar : महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ला एकनाथ शिंदेचं उत्तर काय?
Abdul Sattar on Mahavikas Aaghadi : वज्रमूठ दाखवण्यासाठी आमच्याकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे ज्यावेळी अयोध्येमध्ये धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर आम्ही राज्यभर एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख झाले आणि धनुष्यबाण गावगावत पोहचवण्यासाठी आम्ही विशेष यात्रा सुरु करत आहोत. त्याची सुरुवात आम्ही संभाजीनगर मधून करत आहोत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
अब्दुल सत्तार यांनी आज ‘लोकमत’ वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली त्यामध्ये ते बोलत होते. त्यांनी यावेळी काल छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेला उत्तर दिली आणि राज्यातील सद्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं.
Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र येतील असं वाटत नाही. असं मत सत्तर यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या अगोदर तिन्ही पक्षाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण कागदावर दिसत असलेली ही आघाडी मतदान करताना दिसणार नाही. असा दावा त्यांनी यावेळी केला.
राज्यात सध्या ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करत आहे. तत्यामुळे महाविकास आघाडीचं काय इतर पक्षही एकत्र आले तर त्यांना सत्ता मिळणार नाही. या सरकारने सर्वात चांगले काम केले आहे. फक्त कृषी खात्यामधून हे सरकार आल्यापासून हजारो कोटींची मदत केली आहे. त्यामुळे भावनिक मुद्दयांचा परिणाम आगामी निवडणुकीत परिणाम होणार नाही.
MahaVikas Aghadi : …म्हणून उद्धव ठाकरेंना मोठी खुर्ची, अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण
अब्दुल सत्तार यांचा ‘सर्वाधिक’ फायदा?
सोशल मीडियावर चर्चा असते राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन नवीन सरकार आल्यानंतर ज्या काही लोकांचा सर्वाधिक फायदा झाला त्यामध्ये सत्तार यांचे नाव घेतले जाते. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की महाविकास आघाडी सरकारमध्ये पूर्ण सरकार अजित पवार यांनी हायजॅक केलं होत. कोणतेही छोटं काम करून घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे जावं लागायचं. त्यावर आम्ही जो निर्णय घेतला, त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येणार हे मला माहित होत. पण सरकार आलं तरी मी त्यात मंत्री होईल, हे माहित नव्हतं. असं सत्तार यांनी सांगितलं.
राज्यात एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. कोणत्याही नागरिकाला कोणत्याही वेळी मदत लागली तर एकनाथ शिंदे ते पूर्ण करतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या जीवावर आम्ही पुन्हा निवडून येऊ आणि राज्यात पुन्हा आमचे सरकार येईल, असा दावा या मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांनी केला आहे.