धमकी प्रकरणात कार्यकर्ता मयूर शिंदे यांचे नाव येताच सुनील राऊत म्हणाले…

  • Written By: Published:
धमकी प्रकरणात कार्यकर्ता मयूर शिंदे यांचे नाव येताच सुनील राऊत म्हणाले…

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याचे समजते. याप्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
(When activist Mayur Shinde’s name came up in the threat case, Sunil Raut said…)

मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. सुनील राऊत यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी सुनील राऊत यांनी हा बनाव केल्याचे सांगण्यात येत आहे.

आज जेव्हा सुनील राऊत यांनी पत्रकारपरिषदेत मयूर शिंदे कोण आहे असे विचारले तेव्हा सुनील राऊत म्हणतात मयुर शिंदेच काय, सगळेच माझे मित्र आहेत. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, हे सर्व आम्ही केलं. पुढे सुनील राऊतांना मयूर शिंदे आणि राष्ट्रवादी यांचा काय संबंध? असे विचारले असता ते म्हणतात मला माहित काही माहित नाही.

‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत

संजय राऊत हे असल्या धमकीच्या मेसेजेसना घाबरत नाहीत. त्यांना संपूर्ण देश ओळखतो ते कसे आहेत. त्यांना धमकीचा बनाव करण्याची गरज नाही.

पुढे जेव्हा सुनील राऊत यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता सुनील राऊत म्हणतात कोण नितेश राणे असे म्हणत सुनील राऊत यांनी नितेश राणेंची टिंगल उडवली. अशा लोकांची आणि संजय राऊतांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. हा राणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षात जातो. याचे आतापर्यंत 10 पक्ष फिरून झाले आहेत. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत याची आणि आमची कधीच बरोबरी होऊ शकत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube