PM Narendra Modi : डबल इंजिन सरकार नव्हतं तेव्हा…, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

PM Narendra Modi : डबल इंजिन सरकार नव्हतं तेव्हा…, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार नव्हतं तेव्हा विकासासाठी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांनी लगावला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर भारत देश पहिल्यांदाच विकासाचं स्वप्न पाहत असल्याचंही ते म्हणालेत. मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केलीय.

मोदी म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात जेव्हा डबल इंजिनचं सरकार स्थापन झालं तेव्हा आता विकास होत आहे. जगातील लोकांचा भारतातील संकल्पांवर विश्वास असून हा विकास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावलाय.

तसेच देशात याआधी गरीबीवर चर्चा होत होती, देश इतर लोकांना मदत मागत होता, या सर्व गोष्टीमंध्ये तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वेळ घालवला. देशात करामध्ये वेगवेगळे घोटाळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला. त्यांनी भारतात संवेदनशीलतेचं निशाणच मिटवलं होतं.

मात्र, आता राज्यात शिवरायांच्या प्रेरणेने डबल इंजिन प्रस्थापित झालं असून डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा अभूतपूर्व विकास होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. डबल इंजिन सरकार राज्यात नव्हतं तेव्हा अनेक अडथळे विकासासाठी निर्माण करण्यात आले होते. आता सर्व काही योग्य ट्रॅकवर येत असून विकासाआड भाजप राजकारण आणत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

विविध विकासकामांचं लोकार्पण :
मुंबईत एकूण 40 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं असून यामध्ये मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चं लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, एकूण 6 हजार 79 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आलंय.

मोदी म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी विकासाला कधीही ब्रेक लावत नसल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलंय. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाथीने राज्याचा विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

मुंबईच्या विकासासाठी तुम्हांला पैशांची कमी पडू देणार नसून तुम्ही दहा पाऊले चला मी अकरा पाऊले चालणार असल्याचं आश्वासनही मोदींनी मुंबईकरांनी दिलंय. तसेच मुंबईला भविष्यासाठी तयार करा, असं आवाहनही मोदी यांनी केलंय.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मंत्री नारायण राणे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube