सिंघम आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत बिहार झालेल्या बीडला पुन्हा बीड करणार का?
Navneet Kavat new IPS Beed : बीड जिल्हा सध्या राज्यभरातच नाही तर देशभरात चर्चेत आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान घातलं आहे. त्यातच या सर्व घटनांना जातीय आणि राजकीय रंग आहेत. त्यामुळे त्याची अधिकच चर्चा आहे. काही दिवसापूर्वीच बापू आंधळे या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. (Beed) त्यानंतर आता जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर जिल्हा ढवळून निघाला आहे. राजकीय आणि सामाजिक आक्रोस सोबतच उसळला आहे.
घटनेचा सुत्रधार सापडेपर्यंत शांत बसणार नाहीत; देशमुख कुुटुंबाच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
नुकतच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन नागपूर येथे पार पडलं. त्यामध्येही हे प्रकरण गाजलं. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं असून या प्रकरणात कुणालाच सोडणार नाहीत असा थेट इशारा दिलाय. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोण नवा अधिकारी मिळणार अशी चर्चा होती. अखेर, बिडला पोलीस अधिक्षक म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे, बिहार झालेल्या बीडला सुधरवण्यासाठी हा सिंघम अधिकारी आणलाय.
नवनीत कॉवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते.
वविध गुन्ह्यात पोलिसांचे आरोपिंसोबत असणारे लागेबांधे, काही गुन्ह्यात आदळून आलेला काही पोलिसांचा सहभाग, एकतर्फी गुन्हे दाखल करणे आदी प्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेवर विधानसभेत सलग तीन दिवस वादळी चर्चा झाली. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आणि नवनीत कॉवत यांची नियुक्ती केलीयी. कॉवत यांची ओळख ही डॅशिंग अधिकारी, सिंघम अधिकारी अशी असल्याने येत्या काळात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला ते नेस्तनाबूत करतील काय अशी चर्चा सुरू झालीये.