उर्फीचं समर्थन करणाऱ्या महिलांना लाज वाटली पाहिजे

उर्फीचं समर्थन करणाऱ्या महिलांना लाज वाटली पाहिजे

मुंबई : आपल्या कपड्यांच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. यामुळे महिला राजकीय नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात उर्फी जावेद प्रकरणामुळे शाब्दिक वाद निर्माण झाले आहे. या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली आहे.

उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन तिला समर्थन करणाऱ्या महिलांवर करुणा शर्मा यांनी जोरदार टीका केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न कपड्यांमध्ये हिंडणाऱ्या उर्फीला पाठींबा देणाऱ्या राजकीय महिला बिनडोक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. करुणा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात सध्या उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन जे प्रकरण सुरू आहे. त्या कपड्यांचा मी देखील विरोध करते. अर्धनग्न कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरणे ही वाईट गोष्ट आहे. ही सर्व महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या राजकीय महिला उर्फी जावेदचे समर्थन करतात किंवा तिला पाठींबा देतात, त्यांना लाज वाटायला हवी. कारण, अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन त्या करत आहेत. अशा महिला बिनडोक आहेत, अशी टीका करुणा शर्मा मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान उर्फी प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आमने-सामने आल्या आहेत. उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यानंतर राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube