स्वप्नांच्या पाठलागात मृत्यूची सावली; पुण्यात भरतीदरम्यान धावताना तरुण दगावला

पोलीस भरती धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर भरती प्रक्रिया सुरू असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 113

Youth dies while running during recruitment in Pune : अनेक तरुण-तरुणींचा स्वप्न असत की, मी पोलीस अधिकारी व्हावं. त्या स्वप्नासाठी ते कठोर परिश्रम देखील घेतात. मात्र, मर्यादित जागांमुळे अत्यंत स्पर्धात्मक वातावरण निर्माण होतं आणि मोजक्याच उमेदवारांना लोकसेवेचे संधी मिळते. अशातच पुण्यातील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर भरती प्रक्रिया सुरू असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धावण्याच्या चाचणीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने हा मृत्यू झाला. पुरुषोत्तम बुरकूल असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो पोलीस भरतीसाठी पुण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे या घटनेचा संबंध आहे का, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, तज्ज्ञ डॉक्तरांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. धावण्याच्या चाचणीत सहभागी होण्यापूर्वी उमेदवारांनी प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करून घेणं अत्यावश्यक आहे. यामध्ये हिमोग्लोबिन पातळी, रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि इसीजी तपासणीचा समावेश होतो.

फेसबुकवरून ओळख वाढवून लॉजमध्ये नेले, मादक पदार्थ देत अत्याचार; पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरू जेरबंद

तसंच, स्पर्धेच्या दिवशी शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हात दीर्घकाळ उभं राहणं किंवा धावण्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होऊ शकतो. त्यामुळे बीपी कमी होणं किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील आरोग्य सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

follow us