आधी अत्याचार, मग बंदुकीचा धाक दाखवून इस्लाम कबुल करण्याची धमकी

आधी अत्याचार, मग बंदुकीचा धाक दाखवून इस्लाम कबुल करण्याची धमकी

Threat to a minor girl : महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या (Sexual assault) घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कितीही कठोर कायदे केले तरी या घटना थांबतांना दिसत नाही. काल मुंबईतील धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना ताजी असतांनाच आता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation)करून तिला बनावट बंदूक दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी (Bhayander Police) या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. (Accept Islam otherwise I will shoot you, threatened 13-year-old girl, two youths arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 13 वर्षांची असून ती भाईंदर येथे राहते. एक जूनपासून मुनव्वर मन्सूरी आणि अजीम मन्सूरी हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याचा प्रयत्न करत होते. मुनव्वर मन्सूरी (20) याने 12 जून रोजी रात्री 8.30 च्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. यानंतर त्याने मुलीला बुरखा, चेन आणि अंगठी दिली आणि बुरखा घालून तयार होण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू, असं त्याने अल्पवयीन मुलीला सांगितले. मात्र पीडितेने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वरने पीडित मुलीला बनावट पिस्तूल दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबूल कर अन्यथा गोळ्या घालीन, अशी धमकी दिली.

मोदींच्या दौऱ्याआधीच गुडन्यूज! चीनला टाळून अमेरिकन कंपनी भारताच्या दारात 

पीडित मुलीने तिच्या आईला हा घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेऊन पोलिसांनी सदर घटना सांगितलं. त्यानंतर भाईंदर पोलिसांनी मुनव्वर अन्सारी (20) आणि अजीम मन्सुरी (18) यांच्यावर विनयभंगाच्या कलम 354, 354 (ए) 506 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आम्ही दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने अधिक माहिती देता येणार नाही, असं भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube