गृहमंत्री अमित शाहांचं मुंबईत आगमन; कार्यकर्त्यांची घेणार बैठक

गृहमंत्री अमित शाहांचं मुंबईत आगमन; कार्यकर्त्यांची घेणार बैठक

Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)मुंबईत पोहोचले आहेत. ते मुंबईमध्ये (Mumbai)भाजप (BJP)कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणणीतीसह राज्यातील (Maharashtra)महत्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet expansion), आगामी लोकसभा (Loksabha Election)व मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणणीतीवर देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) अमित शाह चर्चा करणार आहेत. शाह यांचे आगमन होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar)आणि अन्य नेत्यांनी विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत केले.

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, जगदंब तलवार लवकरच भारतात येणार

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी मुंबई, नवी मुंबईत वाहतूक बंदी असणार आहे. रविवारी, शाह खारघर येथे 76 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते आणि सुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान) प्रदान करतील. या सत्कार समारंभात रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून लाखो लोक धर्माधिकारी यांना पाठिंबा देणार असल्याचे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्रीपासून मुंबईतील सहार, कुलाबा, विलेपार्ले, खेरवाडी, वाकोला, वांद्रे, वरळी, गमदेवी, डीबी मार्ग, मरीन ड्राईव्ह, कफ परेड आणि मलबार हिल या विमानतळ परिसरात येणाऱ्या भागात पोलिसांचे फ्लाईंग सुरू होते. स्टेशनमध्ये ड्रोन, पॅराग्लायडर, फुगे, पतंग आणण्यास परवानगी नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अन्य नेत्यांनी विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत केले. शाह यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर आहे.

शाह यांच्या दौऱ्यासाठी गुजरातमधून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यात शनिवार ते रविवार 36 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हलकी आणि आपत्कालीन वाहने सुरू राहतील. तर दुसरीकडे महामार्गावर गुजरातमधून येणाऱ्या वाहनांना कोणताही फटका बसणार नाही. खासगी वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि सरकारी वाहनांना महामार्गावरून ये-जा करण्यास परवानगी असेल.

रविवारी खारघरच्या कार्यक्रमानंतर अमित शाह दुपारी 12.30 वाजता जेवण करून दुपारी 2.10 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतील आणि 2.15 वाजता गोव्याला रवाना होतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube