भिवंडीतील दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
Bhiwandi Building Collapsed : भिवंडीच्या (Bhiwandi)वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी भेट दिली. आत्तापर्यंत या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाच्या कामाची माहिती घेतली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या आहेत. त्याचवेळी याठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
देवदत्त निकम यांचा सनसनाटी विजय; वळसे पाटलांना धडकी
या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेतले आहे. या इमारतीचे बांधकाम ठेकदार कोण होते? याचाही शोध सुरु आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.
भिवंडीमध्ये अनधिकृत आणि धोकादायक तसेच अती धोकादायक इमारतींचा प्रश्न सातत्यानं समोर येत आहे. त्यातच इमारत दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दुर्घटना थांबवण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे.
भिवंडीमधील अतिधोकादायक इमारतींचा लवकरच सर्वे करुन अति धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडीचे मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिले आहेत.