मोठी बातमी! मुंबई महापालिकेसह रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती

मोठी बातमी! मुंबई महापालिकेसह रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती

Mandatory masks in Mumbai : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनानं (Covid-19)पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation)क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये(Hospitals), तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावं, अशी सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal)यांनी केली आहे. यामध्ये विशेषतः 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणं (Mandatory masks)आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणं सक्तीचे असणार आहे, असेही इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले आहेत.

अडाणी आणि मोदींचा संबंध काय? आम्ही विचारत राहणार…

कोरोनाच्या वाढत्या रग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज (दि. 10) तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी महापालिका आयुक्त चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेला सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत.

वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही बेड सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून आयुक्तांनी विविध सूचना याप्रसंगी केल्या आहेत.

कोरोना नियंत्रणासाठी महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झालं आहे. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांची खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube