राऊतांना उत्तर देणाऱ्या नवनाथ बनसह ‘यांना’ संधी; मुंबई मनपासाठी भाजपचे उमेदवार निश्चित
BJP च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या संभावित उमेदवारांची काही नावं समोर आली आहेत. त्यात नवनाथ बन याचं नाव आहे.
BJP Candidate List for BMC Election including Navnath Ban : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेची (BMC Election) निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच असणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. परंतु दोन्ही बाजूकडून अद्याप जागा वाटप निश्चित होऊन उमेदवाऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. मात्र आता भाजपच्या काही उमेदवारांची नावं समोर आली आहेत. त्यामध्ये संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देणारा भाजपचा आक्रमक चेहरा असलेल्या नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यासह अनेकांची नावं आहेत.
राऊतांना उत्तर देणाऱ्या नवनाथ बनसह ‘यांना‘ संधी!
गेल्या काही दिवसांपासून भाजपचा आक्रमक चेहरा अशी ओळख निर्माण केलेले नवनाथ बन हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देतात. तसेच मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात ते घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 135 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.
त्याचबरोबर युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग दिवाना हे वार्ड क्रमांक 47, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वार्ड क्रमांक 9, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल वार्ड क्रमांक 10, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या वार्ड क्रमांक 107, स्नेलह तेंडुलकर, सन्नी सानप, तेजस्वी घोसाळकर अशी नाव भाजपच्या संभावित यादीतून समोर आली आहेत, भाजपकडून ही यादी थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील सांगितलं जात आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ही यादी उशीरा जाहीर केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून मुंबई महानगरपालिकेसाठी तब्बल 128 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे.
