पवारांचं स्वप्न, प्रफुल्ल पटेलांचा दावा, ”चिनू’ चं उदाहरण देत भाजपकडून खिल्ली

पवारांचं स्वप्न, प्रफुल्ल पटेलांचा दावा, ”चिनू’ चं उदाहरण देत भाजपकडून खिल्ली

Keshav Upadhyay on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1996 मध्येच देशाचे पंतप्रधान झाले असते असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. पटेलांच्या त्या दाव्याची भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, ‘चिनू उभा राहिला, कुणी नाही पहिला.’
तशी पवारांची गंमत आहे, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की प्रमोद महाजनांनी एक उदाहरण दिलं होतं की शरद पवारांचं कसंय म्हणाले लहान मुलांसारखंय. लहान मुलांना आपण म्हणतो ‘चिनू उभा राहिला कुणी नाही पाहिला. तसं पवारांच आहे कधी उभा राहिले आम्ही नाही पाहिले. दर चार वर्षांनी आम्ही एकायचो की पवार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. ज्यांना राजकारणाचे गणित कळते त्यांना महिती असेल की कधी दोन अंकीपेक्षा जास्त खासदार निवडून आणू शकले नाहीत. कोणी म्हणेल की गुजराल वैगरे लोक झाले पण पवार कधी दिसले नाहीत, असे केशप उपाध्ये यांनी म्हटले आहे.

PUBG Game : मुंब्य्रापाठोपाठ संगमनेरमध्ये पोहचले धर्मांतराचे ऑनलाईन रॅकेट

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते की मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवार यांनाही आहे. 1996 साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम येचुरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढला होता. तेव्हा काँग्रेसमध्ये शरद पवारांना पोषक वातावरण होते. 101 टक्के सर्वजण त्यांच्या पाठिशी उभे होते. तेव्हा पवार ठाम राहिले असते तर कदाचित देवेगौडा यांच्यानंतर आय के गुजराल नव्हे तर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते.

प्रफुल्ल पटेल पुढं म्हणाले की तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर 11 महिन्यांतच केसरींनी देवेगौडांचा पाठिंबा काढला. त्यावेळी काँग्रेची पारिस्थितीही चांगली नव्हती. 145 खासदार होते. शरद पवार संसदीय नेते होते. देवेगौडांचा पाठिंबा काढल्यानंतर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube