Nitesh Rane: ठाकरे पिता-पुत्र तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य झाले का ?

Nitesh Rane: ठाकरे पिता-पुत्र तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य झाले का ?

मुंबई : काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरुनच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

1993 च्या बॉम्बलास्टचा करता धरता आणि दाऊदचे समर्थन करणाऱ्या बरोबर मांडीला मांडी लावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं ज्यांनी समर्थन केलं अशा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण मांडीला मांडी लावून बसले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते हे तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य झाले आहेत का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

नितेश राणे पुढं म्हणाले, यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो. पण, आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही, असा जोरदार टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Supriya Sule : पूर्वी पोर न्यायची आता वडीलही भाजपवाले न्यायला लागलेत, बायकांनो सांभाळून राहा

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नवे समीकरण पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. उद्धव ठाकरे हे सिंहाचे पुत्र आहेत. उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा आहे. देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. हे नाते आम्ही पुढे नेऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी भेटीत म्हंटले होते. भाजप फक्त गुंडगिरी करतो. सगळ्या देशाला गहाण ठेवलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube