Chandrakant Patil यांनी आश्वासनमंत्री म्हणून नवे खाते स्वीकारावे, मोहन जोशी यांची टीका

  • Written By: Published:
Chandrakant Patil यांनी आश्वासनमंत्री म्हणून नवे खाते स्वीकारावे, मोहन जोशी यांची टीका

पुणे : पुणे मेट्रोचा (Pune Metro) तिसरा टप्पा असलेला गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गिकेवरील मेट्रो २६ जानेवारीपर्यंत धावेल, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आश्वासन दिले होते. पण २६ जानेवारी उलटून गेल्यांनतरही मेट्रो मार्गिका न सुरु झाल्याने काँग्रेसकडून यावर टिका करण्यात आली आहे.

२६ जानेवारीचा मुहूर्त हुकल्यानंतर आता मार्च महिन्यात सेवा सुरू होईल, असे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता मंत्रीपदाच्या खात्यामध्ये आश्वासनमंत्री म्हणून नवे खाते स्वीकारावे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. यावेळी बोलताना म्हणाले की “जनतेला आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत, ही भाजपची कार्यपद्धती आहे.”

या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची प्रवासी सेवा २६ जानेवारीपासून सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांनी ही विचारणा करत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. जनतेला आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत, ही भाजपची कार्यपद्धती आहे. महागाई कमी करू, अच्छे दिन आणू, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवू अशी असंख्य आश्वासने भाजप नेत्यांनी दिली. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास बांधील आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube