CM शिंदेची मुस्लिम समाजाला साद; मोठ्या निधीची घोषणा

CM शिंदेची मुस्लिम समाजाला साद; मोठ्या निधीची घोषणा

राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुंबईत मेळावा घेण्यात आला. शिवसनेचे नेते सईद खान (Saeed Khan) यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा हा मेळावा सायन येथील षणमुखानंद हॉल येथे घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजाला साद घातली. अल्पसंख्यांकसाठी १०० करोड देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. (CM Eknath Shinde announces to give 100 crores for minorities)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जात-धर्म बघून निधी देत नाहीत. ते भेदभाव न करता सर्वांना समान निधी देतात. शेतकऱ्यांना ६००० रूपये अनुदान दिल्या जाते. त्यातही सरकार भेदभाव करत नाही. आता आम्ही २८०० मुस्लिम महिला बचत गट करणार आहोत. शिष्यवृत्ती ५०, ००० रुपये केली आहे. अल्पसंख्याकांसाठी १०० करोड देण्यात येणार आहे. मदरशांना देखील अनुदान देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, माझ्या घरात एक कर्मचारी राहतो. मी त्याला पोरासारखं मानतो. तो आदिल आहे, असं म्हणत मुस्लिम समाजाला आपलंस करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. १ वर्षात आम्ही वैद्यकीय मदत केली. १०-११ हजार लोकांना पैसे दिले. त्यात १००० हून अधिक लाभार्थी मुस्लिम आहेत. सरकार म्हणून मदत करतांना आम्ही बघत नाही की, हिंदू आहे की मुसलमान आहे. आम्ही बघतो हा मनुष्य आहे.

Rain Update: उत्तर भारतात ‘जल प्रलय’… हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर, अनेकांचा मृत्यू

ते म्हणाले, मी फक्त आश्वासन देत नाही. होणार असेल तर करुन टाकतो. मागील सरकारमध्ये सर्वजण घरी बसून होते. आता एकनाथ शिंदे यांनी सर्वांना कामाला लावले आहे. कोणाच्या कमरेचा पट्टा निघालाय, तर कोणाचा मानेचा, असा टोलाही त्यांना उध्दव ठाकरेंना लगावला.

मुस्लिम समाजातील अनेक लोक शिवसेनेचे नगरसेवक आहेत. साबीर शेख 1995 मध्ये मंत्री होते, आता अब्दुल सत्तार आहेत. कोणावरही अन्याय झालेला नाही. आपण सगळे मिळून सण-उत्सव साजरे करतो. दंगलीत दोन्ही लोक सामील होतात. मशिदींच्या सुरक्षेसाठीही आम्ही काम करतो. काँग्रेसने अनेक वर्षे फसवणूक केली, अशी टीकाही त्यांनी केली.

सईद खान म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रश्न मागच्या पंधरा वीस वर्षापासून रखडलेल्या आहेत.अल्पसंख्यांक समाजाला काही लोकांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजत होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने फक्तं आमचा वापर करून घेतला. आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे आम्हाला न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, या मेळाव्यात राज्य भरातुन मुस्लिम समाजातील विविध राजकीय पक्षाचे व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास 300 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यात नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक यांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube