राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध; काँग्रेसचा मुंबईत ‘मौन सत्याग्रह’
Congress Satyagraha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून सत्याग्रह केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसकडून एकदिवसीय मौन सत्याग्रह सुरु आहे. या सत्याग्रहात राज्यातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखीस सहभागी झाले आहेत.
भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यात येत आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आजचे मौन सत्याग्रह आंदोलन आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. मुंबईतील मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या वतीने मौन सत्यग्रह आंदोलनास सुरुवात झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, यशोमती ठाकूर, भाई जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, महत्वाचे नेते यात सहभागी झाले आहेत.
अजितदादांसोबत गेलेल्या संजयमामांना टक्कर देणार पवारांचा शिलेदार; मोठी शक्ती उभी करण्याचा निर्धार
सकाळी 11 वाजेपासून सत्याग्रह आंदोलनास सुरुवात झाली. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन असणार आहे. दिवसभरात मौन सत्याग्रह आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते टप्याटप्याने सहभागी होणार आहेत. भाजप सरकारच्या विरोधात काळ्या रंगाची मुखपट्टी लावून मौन राहून विरोध दर्शविला जात आहे. गांधी पुतळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाची बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
राहुल गांधीजी यांना केंद्र सरकारने खोट्या प्रकरणात अडकवून त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या विरोधात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आज 'मौन सत्याग्रह'..!!@RahulGandhi @HKPatilINC pic.twitter.com/pkXr3s2oh5
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) July 12, 2023
गुजरात हायकोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली आहे. गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या 2019 च्या खटल्यात सुरतच्या दंडाधिकारी न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधी यांना दोषी ठरवले. दोन वर्षांची तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत.