Devendra Fadnavis : उरलेसुरले दहा-पंधरा निघून जातील या भीतीने…

  • Written By: Published:
Untitled Design (6)

नाशिक : हे सरकार बेकायदेशीर आहे. 40 आमदार अपात्र होणार आहेत, सुप्रीम कोर्टात आपण जिंकणारच आहोत पण कायदा आम्हाला देखील कळतो, संविधान आम्हाला देखील समजते. उरलेसुरले दहा-पंधरा आहेत तेही निघून जातील या भीतीने असं बोललं जातंय, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

‘आम्ही जे केले आहे ते नियमाने केले आहे. कायद्याचा अभ्यास करुन केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे सुप्रीम कोर्टात आपल्या बाजूने निर्णय येईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश पदाधिकारी मेळाव्यात केला.

विरोधी पक्षांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘यांच एक चांगलं आहे. यांच्या बाजूने निकाल दिला की सुप्रीम कोर्ट उत्तम आणि यांच्या विरोधात निकाल दिला की न्यायालयावर दबाव आहे. निवडणूक आयोगाबद्दल बोलतात की निकाल आमच्या बाजूने येईल आणि विरोधात दिला तर आयोगावर दबाव आहे. अशा प्रकारे देशातील सर्वोच्च संस्था आहेत त्यांच्याबद्दल प्रश्व उपस्थित करण्याचे काम विरोधकांकडून केला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Tags

follow us