थेट फडणवीसांच्या नावाने मेल; अधिकाऱ्यांच्या बनावट बदल्यांचा प्रकार उघड

थेट फडणवीसांच्या नावाने मेल; अधिकाऱ्यांच्या बनावट बदल्यांचा प्रकार उघड

Devendra Fadnavis fake mail case : दिवसेंदिवस राज्यात सायबर गुन्ह्यांच्या अनेक घटना घडत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खाजगी सचिव विद्याधर दयासागर महाले (Vidyadhar Dayasagar Mahale) यांचा बनावट मेल आयडी बनवून अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर मुंबईने यांनी संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. महंमद इलियास याकुब मोमीन (Muhammad Ilyas Yakub Momin), असं संशयित आरोपीचं नाव आहे. संशयित आरोपी हा उच्च शिक्षित आहे.

‘भाजपाच्या मेहेरबानीने पालकमंत्रिपद, चौकटीत राहून काम करा’; भाजप नेत्याचा मुश्रीफांना इशारा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याधर दयासागर महाले यांनी तीन ऑक्टोबरला नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर मुंबई येथे तक्रार नोंदवली. तक्रारकर्ते महाले हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आहेत. महाले यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं की, संशयीत इसमाने vidyadharmahale.min@gmail.com खोटा ईमेल आय डी तयार केला. या बनावट ईमेल आयडी वरुन पाठविण्यात आलेल्या बनावट पत्रांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बनावट स्वाक्षरी करुन त्यांच्या लौकिकास बाधा निर्माण होईल, असं कृत्य केलं.

संशयित आरोपीने काही अधिकाऱ्यांच्या बदलींच्या ऑर्डर्सही काढल्या. आरोपी बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाच्या सेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करायचा. आरोपीने तोतयागिरी करून अनेकांची फसवणूक केल्यानं आरोपीविरुध्द गु.नों.क्र.११/२०२३, कलम ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४१९, ४२०,१२०(ब) भा.दं.सं.सह कलम ६६ (क). ६६(ड) आयटी. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, तक्रारप्राप्त होताच सायबर पोलिसांनी आपली तपास चक्र फिरवून ४ ऑक्टोबरला मिरज शहर पोलीस ठाणेच्या मदतीने आरोपी इसम महंमद इलियास याकुब मोमीन याला अटक केली. विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस अधीक्षक संजय शिंदे, प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाख पोलीस निरीक्षक राजेश पुकळे, पो.शि.संजय राजपुत, अक्षय गोळे, श्याम आगवणे यांनी ही अटकेची कारवाई केली. आरोपीचे वय ४० वर्ष असून व्यवसायाने तो खाजगी कॉन्ट्रेक्टर आहे.

गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून आज आरोपीला न्यालायता हजर करण्यात येणार आहे. आरोपीने या गुन्ह्यासाठी किती डिव्हाईस वापरले, त्यासोबत अन्य काही साथीदार होते का, याची तपास पोलिस घेत आहेत.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube