प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. सुमित्रा सेन यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं.

सुमित्रा सेन यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी श्राबनी सेन यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली. फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आईच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आई आज भोरमध्ये आम्हाला सोडून गेली…’ अशी पोस्ट श्राबनी सेन यांनी केलं आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचं निदान झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांनंतर त्यांची प्रकृती खालावली, अखेर ३ जानेवारीला पहाटे सुमित्रा सेन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संगित विश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सुमित्रा सेन यांची मुलगी श्राबनी सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळाच्या समस्यांनी त्या त्रस्त होत्या. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सुमित्रा सेन यांना घरी आणण्यात आलं. घरी आल्यानंतर नव्या वर्षी सुमित्रा यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुमित्रा सेन यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सुमित्रा सेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube