रेग्युलर पनीरच्या पॅकिजमध्ये ‘अॅनालॉग’ विक्री; केकसाठी मुदत संपलेले कलर; मुंबईत धक्कादायक प्रकार उघडकीस

FDA: प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा, विक्री, वितरण व वाहतूक प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर 99 लाख 39 हजार किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
FDA Action In Pune

मुंबई: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्यात एफडीएने (FDA) मोठ्या कारवाई केल्या आहेत. 14 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासना मोठी कारवाई केलीय. पुणे व मुंबईतील अनेक हॉटेल्स कारवाई झाली आहे. त्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये रेग्युलर पनीर एेवजी अॅनालॉग पनीरचा वापर आढळून आला आहे. राज्यभर हॉटेल्स कारवाई सुरू असताना हॉटेलमध्ये स्वच्छता पाळली जात नाही, हे एफडीएच्या कारवाईवरून समोर येत आहे.

महिन्याभरातील कारवाईत 2 लाख 54 हजार लिटर प्रमाणातील कोलोस्ट्रमचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा, विक्री, वितरण व वाहतूक प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर 99 लाख 39 हजार किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर इतर अन्नपदार्थांचा 5 हजार 650 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. तर राज्यातील 65 हॉटेल, रेस्टारंट, धाबा इत्यादी ठिकाणी तपासणी करून 50 जणांना सुधारणांच्या नोटीसा दिल्या आहेत. तर आठ अन्न आस्थापनाचे परवाने रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व कारवाईत 1 कोटी 7 लाख 61 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सहा हॉटेल, क्लबचे परवाने निलंबित
मुंबईतील वांद्र येथील Otters Club चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. या क्लबमध्ये तपासणीदरम्यान पंजाब सिंध डेअरी यांचे रेग्युलर पनीर या नावाने अॅनालॉग पनीर आढळून आले आहे. या ठिकाणी फरशी अस्वच्छ आढळून आली. तसेच विविध रेफ्रिजरेटर्सच्या गॅस्केट, लायनिंग खराब झाल्यामुळे दरवाजे व्यवस्थित बंद होत नव्हते. त्यामुळे तापमानात चढ उतार असल्याचे आढळून आले. तसेच शिजवलेल्या, तयार अन्नपदार्थांच्या विक्रीसंदर्भात आवश्यक सूचनाफलक लावण्यात आलेला नव्हता. राज्यात अॅनालॉग पनीरला बंदी असताना या क्लबमध्ये पंजाब सिंध डेअरी यांचे अॅनालॉग पनीर आढळून आले आहे. यापासून विविध पनीर पदार्थ तयार करून विक्री केली जात होती.

केकसाठी मुद्यबाह्य खाद्य रंगाचा वापर
दहिसर येथील डेअली फ्रेश बेकर्स अॅण्ड केकस दुकानामध्ये मुद्यबाह्य खाद्य रंगाचा वापर आढळशून आला आहेत. तसेच अस्वच्छता आढळून आले आहे. केक तयार करण्यासाठी मुदतबाह्य खाद्य रंगाचा वापर करण्यात येत असल्याचे तपासणीमध्ये आढळून आले आहेत. तसेच या दुकानादाराकडे रिटेल प्रकारची नोंदणी असताना प्रत्यक्षात तेथे केक तयार केले जात होते. मेसर्स प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंटचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. या रेस्टारंटमध्ये अन्न सुरक्षा नियमा पाळले जात नव्हते. तसेच स्वच्छताही नव्हती. विलेपार्ले येथील राज ऑईल ट्रेडिंगचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच कॅफे सायफ्रश (CAFE Sifarish) , चेंबूरमधील झेप्टो येथील परवाना निलंबित करण्यात आला आहे. पुण्यातील हॉटेल चूल मटणचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. येथे स्वच्छता पाळली जात नव्हती.

follow us