Chandrakant Patil : ‘शासकीय कामकाज मिशन मोडवर करावं’
मुंबई : प्रशिक्षणामुळं नवीन ज्ञानप्राप्ती होऊन विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन मिशन मोडवर (Mission Mode) करावं, असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)यांनी केलंय. मुंबई मधील डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ (Dr. Homi Bhabha State Group University, Mumbai)येथे नवनियुक्त विभागीय सहसंचालकांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षणाचं उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी(VikasChandra Rastogi), उपसचिव प्रताप लुबाळ(Pratap Lubal), अजित बाविस्कर (Ajit Baviskar) उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (Dr. Shailendra Devlankar) व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, प्रशिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या विकासाचं माध्यम असून सक्षम बनविण्याचं साधन आहे. नवीन विषय आत्मसात करण्यासाठी तसेच त्याचं अचूक आकलन होण्यासाठी आणि त्याच्या योग्य अवलंबासाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे.
विभागीय सहसंचालक हे पद महाविद्यालय आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून प्रशिक्षण घेऊन शासकीय कामकाजाला अधिक गती द्यावी, असंही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी नवनियुक्त विभागीय सहसंचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.