बागेश्वर बाबांना हायकोर्टाचा दिलासा तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला झटका
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादात सापडलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांचा मुंबईत एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) विरोध केला आहे. त्यांच्या या कार्यक्रमाविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बागेश्वर बाबा यांचा आज आणि उद्या मीरा भायंदर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांचा हा कार्यक्रम होऊ नये यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण त्यांच्या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाने (High Court) परवानगी दिली आहे.
‘आमच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची खेचली’, थोरातांनी मुख्यमंत्र्याची समोरासमोरच खेचली
हायकोर्टाने सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांचा युक्तिवाद मान्य केला आहे. विशेष म्हणजे हाय कोर्टाने ज्येष्ठ वकील नितीन सातपुते यांची याचिका फेटाळताना कडक ताशेरे ओढले आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल केल्याचे मत कोर्टाने व्यक्त केलं आहे. पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने कायद्याचं पालन करावं, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी बागेश्वर बाबांनी नागपूरमध्ये दरबार भरवला होता. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने बागेश्वर बाबा चर्चेत आले आहेत.