घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी

घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी

मुंबई : आपल्या स्वतःचं घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. म्हाडाकडून लवकरच 4721 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही सोडत पार पडण्याची शक्यता आहे. म्हाडामध्ये नुकतीच ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळं लवकरच म्हाडाच्या कोकण विभागाकडून घरांची सोडत होण्याची शक्यता आहे.

म्हाडा कोकण मंडळाकडून 2022 मध्ये घरांसाठी सोडत काढली जाणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांस्तव ही प्रक्रिया लांबल्याचं पाहायला मिळाली होती. संगणकीय प्रणालीतील बदलाची प्रक्रिया सुरू झाल्यानं 2022 मध्ये कोकण मंडळाची सोडत काढण्यात आली नाही. आता म्हाडाची नवीन सोडत प्रक्रिया आणि नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाल्यानं सोडतीसाठीचा मार्ग सुकर झालाय. म्हाडा कोकण मंडळानं सोडतीमधील घरांची संख्या वाढलीय. लवकरच 4721 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.

म्हाडाच्या कोकण विभागात नवीन घरांची भर पडलीय. ठाणे येथील समूहाच्या प्रकल्पातील 20 टक्के योजनेतील 256 घरं आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरांची यात भर पडलीय. याअनुषंगानं म्हाडाच्या जाहिरातीतही काही बदल करावं लागणारंय. परिणामी ही सोडत जाहीर करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा अवधी लागू शकतो.

म्हाडाच्या महामंडळाकडून सुमारे 4721 घरांसाठी येत्या आठवड्यात सोडत काढण्याची तयारी सुरु आहे. यात 20 टक्क्यांतील आणि पंतप्रधान आवास योजनेमधील सुमारे 550 नवीन घरं मंडळाकडं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळं ही 500 घरं म्हाडाच्या योजनेत समाविष्ट करण्यात येताहेत. यामुळं आता म्हाडातील घरांची संख्या वाढली आहे.

उपलब्ध झालेली वाढीव घरं ही अल्प गटांसाठी आहेत. या घरांचं क्षेत्रफळ अंदाजे 300 चौरस फूट असून त्याची किंमत 20 लाखांपर्यंत आहे. विरारमधील पंतप्रधान आवास योजनेतील अंदाजे 300 घरं उपलब्ध झाली आहेत. ही घरं अल्प गटासाठी असून त्याची किंमत साधारण 17 लाखांपर्यंत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube