मी कुणाचाही लॉयल डॉग नाही, जरांगेंची सभा म्हणजे यात्रा; गुणरत्न सदावर्ते यांचा जोरदार पलटवार
Manoj Jarange Patil Vs Gunaratna Sadavarte : जालना (Jalna)जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil)यांची भव्य दिव्य अशी सभा झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal)आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
सदावर्ते म्हणाले की, मी कुणाचाही लॉयल डॉग नाही. मी फक्त अखंड भारताचे मार्गविधाते नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांचा पाईक आहे. मनोज जरांगे पाटील यांची सभा ही फक्त एक यात्रा आहे. लोक अशा यात्रांना येतात. मजा करुन निघून जातात, असा टोला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.
Chhagan Bhujbal : मनोज जरांजे पाटील कुणाचं खातोय…; छगन भुजबळांचा थेट सवाल
आंतरवली सराटी गावात झालेल्या सभेत जरांगे पाटील (manoj jarange patil)यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte)यांच्यावर आगपाखड केली. जरांगे पाटील म्हणाले, एक टमरेळ मध्येचे उठले आणि माझ्या मागे लागले. ते देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचा कार्यकर्ता असल्याचं लोक सांगत आहेत.
भारताने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी का निवडली? नाणेफेकीनंतर रोहितने सांगितले कारण
उपमुख्यमंत्र्यांनी अशी एडपट लोकं पाळली आहेत. ते रात्री म्हणाले मला अटक करा. तो म्हणतोय मी हिंसा करेन, अरे मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. त्याला यश मिळवायचे होते. तेव्हा त्याने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली. आता एक लाख मराठे एकत्र आले तर म्हणतो ते हिंसा करतील, त्यांना अटक करा. आपल्याला अटक करणं एवढं सोप्पं आहे का आता? जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी गुणरत्न सदावर्ते यांना योग्य समज द्यावी.
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की आपण कोणत्याही पॉलिटीकल बॉसचा लॉयल डॉग नाही. असे लॉयल डॉग आज जत्रेत दिसतात. त्यांना जे आरक्षण दिले ते देवेंद्र फडणवीस यांनीच दिले. ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आगपाखड आहे.
आजची सभा ही नापास आहे, नाकाम आहे. आजच्या सभेची चौकशी केली पाहिजे. शरद पवार यांचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ज्या प्रकारे पोलिसांना धमकी दिली. त्यांना माहीत आहे, आम्ही संविधान मानणारे आहोत. रीतसर तक्रार दिली, त्यांना ठरवून टार्गेट केलं. गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. मराठा समाज मागास म्हणून नाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. राजकीय कनेक्टिव्हिटी देत आहेत. जरांगे पाटील यांचे दुसरेच बॉसेस आहेत, असाही पलटवार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.