एक-एक काय फोडता, हिंमत असेल तर निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरेंचं भाजपला चॅलेंज!

एक-एक काय फोडता, हिंमत असेल तर निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरेंचं भाजपला चॅलेंज!

Uddhav Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यापासून पक्षाला गळतीच लागली आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर कालच ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला दणका बसला. माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडींवर आता खुद्द उद्धव ठाकरे स्वतः मैदानात येत जोरदार उत्तर दिले आहे.

LetsUpp Special : पवार पुन्हा भिजणार की ठाकरे डरकाळी फोडणार ?

एकाएकाला काय फोडता. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, अस आव्हानच त्यांनी भाजपला दिलं. ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

ते पुढे म्हणाले, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला फक्त गेल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करू, पक्षाच्या विरोधात काम करू नये. नाहीतर शिवसैनिक म्हणून आपल्याला त्यांना दाखवावे लागेल, असा इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला.

कोणी शिवसेनेतून बाहेर पडलं की बोललं जातं शिवसेनेला धक्का. धक्का कसला?, उलट आपल्याकडे भरतीला जे उधाण येत आहे त्यानेच या लोकांना धक्का बसेल. इतकं होऊनही शिवसेना संपत नाही, हा एकच प्रश्न त्यांना पडला आहे. शिवसेना का संपत नाही, उद्धव ठाकरे का संपत नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. याचीच धडकी त्यांना भरली आहे. एक एक फोडण्यापेक्षा एकदाच काय त्या निवडणुका घ्या, असे आव्हान त्यांनी दिले.

BJP : दोन महिन्यांची सुट्टी दिल्लीतून नामंजूर! मुंडे अन् तावडेंना पुन्हा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube