मोठी बातमी ! जरांगे समर्थकांनी बारस्करांवर हल्ल्याचा कट रचला; पण तो पोलिसांनी उधळला

  • Written By: Last Updated:
मोठी बातमी ! जरांगे समर्थकांनी बारस्करांवर हल्ल्याचा कट रचला; पण तो पोलिसांनी उधळला

Manoj Jarange supporter plotted to attack on Ajay Barskar: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी राहिलेले अहमदनगरचे अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. ते संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट बोलले आहेत. जरांगे यांनी मुंबईच्या आंदोलनाच्या वेळी दोन बैठका बंद खोलीत घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये काय घडले ते जरांगे यांनी सांगावे, असे आवाहन बारस्कर यांनी केले होते. तसेच जरांगे हे समाजाला आणि सरकारला वेठीस धरत असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. त्यावरून अजय महाराज बारस्कर (Ajay Barskar) यांच्यावर जरांगे समर्थक चिडले आहेत. बारस्कर हे मुंबईत आहेत. येथे दोघा जरांगे समर्थकांनी बारस्कर यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. परंतु पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे.

उणीधुणी काढत हेडलाईन मिळवायची, विरोधकांना एवढंच काम; अजितदादांची टोलेबाजी!

गणेश ढोकले पाटील आणि संदीप एकनाथ तनपुरे या दोघांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश ढोकळे पाटील हे अनमोल समय नावाच्या वृत्तपत्राचे संपादक आहेत. तसे कार्ड त्यांच्याकडून आढळून आले आहेत. अजय बारस्कर यांची आज आझाद मैदानाजवळील प्रेस क्बल येथे पत्रकार परिषद होती. ते मनोज जरांगेविरोधात बोलणार होते. परंतु ही पत्रकार परिषद रद्द झाली. अजय बारस्कर हे चर्चगेटजवळील हॉटेल ऑस्ट्रियामध्ये मुक्कामी थांबलेले होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमाराह पाच ते सहा जण हॉटेलमध्ये घुसले होते. हे सर्वजण मनोज जरांगे समर्थक होते. बारस्करांच्या संरक्षणासाठी सध्या पोलिसांचा ताफा आहे.

शेतकरी आंदोलन पोहोचले सुप्रीम कोर्टात, दिल्लीच्या सीमा खुल्या करण्याची मागणी

त्या ठिकाणी पोलिसांनी दोघांना पकडले आहे. गणेश भजनदास ढोकले पाटील असे एकाचे नाव आहे. तो शासकीय कंत्राटदार व एका पेपरचे संपादक आहे. मुळचे लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील आहेत. तर संदीप एकनाथ तनपुरे असे पकडलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तनपुरे हा बांधकाम साहित्य पुरवणारा व्यावसायिक आहे. तो पुणे जिल्ह्यातील खेडमधील राजगुरूनगर येथील आहे. दोघेही नवी मुंबईतील वाशी येथे मुक्कामी येथे होते. तेथून शुक्रवारी सांयकाळी ते बारस्कर यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज