उणीधुणी काढत हेडलाईन मिळवायची, विरोधकांना एवढंच काम; अजितदादांची टोलेबाजी!

उणीधुणी काढत हेडलाईन मिळवायची, विरोधकांना एवढंच काम; अजितदादांची टोलेबाजी!

Ajit Pawar News : एकमेकांची उणीधुणी काढत हेडलाईन मिळवण्याचं काम विरोधकांकडे उरलं असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या समाजिक सेलच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्यव्यापी संविधान गौरव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे.

मॅकडोनाल्डने ‘चीज’ शब्दच हटवला! अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर बदल

अजित पवार म्हणाले, विरोधकांना दुसरा मुद्दा राहिलेला नसल्याने एकमेकांची उणीधुणी काढून हेडलाईन मिळवायची हे काम उरलेले, अशी जहरी टीका अजित पवार यांनी करत कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रवक्ते, कार्यकर्त्यांनी अशा मुद्यांवर बोलताना मर्यादा बाळगायला हवी. आपल्या वक्तव्यातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. निवडणुकीसाठी उरलेले काही दिवस सर्वांनी मिळून जोरकसपणे काम करा, असा कानमंत्रच अजित पवार यांनी दिला आहे.

राजेंद्र पाटणी यांचे निधन; भाजपने विदर्भात चार महिन्यात दुसरा आमदार गमावला

सत्तेला हापापलेला मी नाही…
आम्ही सर्वजण समतेचा विचार करणारे असून लोकशाही मानणारे आहोत. सर्वच जातीधर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल ही आपली भूमिका असते. सत्तेतला हापापलेला मी नाही, ज्या भागाचं आपण प्रतिनिधीत्व करतो त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजेत. विकासात कुठेही मागे न राहता त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजेत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

जोपर्यंत चंद्र-सुर्य तोपर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान जोपर्यंत सुर्य-चंद्र आहे तोपर्यंत कोणाच्या मायेचा लाल हे संविधान बदलू शकत नाही. पण जाणीवपूर्वक समाजातील घटकांना भीती दाखवण्यासाठी समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी काही चुकीच्या बातम्या पसरविल्या जात असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार? नाना पटोलेंनी थेट तारीखच सांगितली

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काही दिवसापूर्वी निर्माण झाला. परंतू प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जो आपल्याला बाबासाहेबांनी दिलायं. जसे संविधान बाबासाहेबांनी दिले तशी कायदा आणि घटनाही त्यांनी दिलीय. जगातील अनेक देशात कित्येक प्रसंग आले परंतु आपला देश एकसंघ राहण्याचे एकमेव कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यांनी दिलेली घटना जी आपण कधीच विसरू शकत नाही, असेही अजितदादा पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज