महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनेकांना उष्माघात, आठ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनेकांना उष्माघात, आठ जणांचा मृत्यू

Many suffered heat stroke during the Maharashtra Bhushan award ceremony : आज प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील अनेक लोक या पुरस्कार सोहळ्यासाठी हजर होते. दरम्यान, या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांपैकी अनेकांना उष्माघात झाल्याची माहिती आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज राज्य शासनाचा महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानवर हा कार्यक्रम पार पडला. हा पुरस्कार सोहळा हा न भूतो न भविष्यती असाच झाला. या सोहळ्याला राज्यातील लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. ऊन-तहान हे सगळं विसरून लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दुपारच्या टळटळीत उन्हातही हा सोहला डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. परिणामी, उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने चक्कर आली.  उष्माघातामुळे 15 अनुयायांची  तब्येत बिघडली असून आठ अनुयायांचा एमजीएम रुग्णालयामध्ये उष्माघाताने मृत्यू झाला आहे. प्रकृती बिघडलेल्या 15 अनुयायांपैकी 9 अनुयायांना वाशी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयुमध्ये दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आठ जणांची प्रकृती बरी आहे, असं सांगण्यात येत आहे. फॉरिज आणि इतर खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांना भरती केलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मतिमंद; ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून टीका

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयात दाखल केलेल्या अनुयायांची भेट घेतली आहे. आता ते वाशी महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये भरती केलेल्या अनुयायांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. 15 अनुयायांची तब्येत ही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube