फुलवंती चित्रपटातील टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला; मनमोहक नृत्यकलेचं दर्शन
Prajakta Mali : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या फुलवंती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. चित्रपट निर्माती अभिनेत्री प्राजक्ता माळीनेच (Prajakta Mali) पोस्टर शेअर करत माहिती दिली होती. ११ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”.. ‘फुलवंती’ चे अस्मानी सौंदर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला ह्यांचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ ह्या शीर्षकगीतातून होणार आहे.
गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे ह्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत आर्या आंबेकरने गायले असून गीतकार जोडी अविनाश-विश्वजीत ह्यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. उमेश जाधव ह्यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी ह्यांची ‘फुलवंती’च्या रूपातील अदाकारी ह्यांनी ह्या शीर्षकगीतात दिसणार आहे.
‘फुलवंती’ हा संगीतप्रधान ऐतिहासिक चित्रपट असून ह्या चित्रपतील सर्वात महत्वाची भूमिका संगीत दिग्दर्शकांची आहे. ‘फुलवंती’विषयी अविनाश-विश्वजित म्हणतात की, ‘फुलवंती’ च्या गाण्यांमध्ये असणारी भव्यता, नजाकत, तो काळ आणि सुमधूर संगीत ह्यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि त्यासाठी केलेली मेहनत प्रेक्षक अनुभवणार आहेत. ह्याची खूप उत्सुकता आहे. तसेच ही पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची केली घोषणा, लुक पाहून चाहते थक्क!
‘फुलवंती’..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पॅनोरमा स्टुडिओजचे सादरीकरण आहे. ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
चित्रनगरीच्या बाप्पाचे थाटामाटात आगमन, प्राणप्रतिष्ठा करून बाप्पा झाले विराजमान