Mumbai : IPS ब्रिजेशसिंह मुख्यमंत्री कार्यालयात; IAS अधिकाऱ्यांत अस्वस्थता

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (45)

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांनी आज दोन महत्त्वाच्या पदाच्या नियुक्ति केल्याने प्रशासनात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंग ( IPS Brijesh Singh )  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी या पदावर आल्याने आयएएस अधिकारी केडर मध्ये याविषयी कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या काळात ब्रिजेश सिंग हे माहिती संचालनालयाचे महासंचालक असताना अनेक वादग्रस्त प्रकरणात राहिले होते. त्यामुळे महाआघाडी सरकारने त्यांना साईडपोस्ट दिली होती.

ते आता गृहरक्षक दलात अतिरिक्त महासंचालक या पदावर होते. येथून ते आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सचिव म्हणून दाखल झाले आहेत. या कार्यालयात काम पाहणारे भूषण गगराणी आता अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून तर विकास खरागे मुख्य प्रधान सचिव म्हणून काम पाहतील.

तर दुसरीकडे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रांसफोरमेशन म्हणजेच मित्रा या संस्थेच्या सीईओ पदावर पंतप्रधान कार्यालयातून निवृत्त झालेले प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे महाराष्ट्र मध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव होते . त्यानंतर ते महापालिका आयुक्त आणि नंतर पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती वर गेले.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुपर सीएम म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत का?, असा सवाल तेंव्हा नारायण राणे यांनी उपस्थित केला होता. असे दोन अधिकारी आता मुख्यमंत्री यांच्या दिमातीला आले असल्याने मुख्यमंत्री कार्यालकडून मोठया कामांची अपेक्षा व्यक्त होतेय.

Tags

follow us