Mumbai News : पुन्हा बोलला तर उडवून टाकू… अबू आझमींना धमकीचा फोन

  • Written By: Published:
Mumbai News : पुन्हा बोलला तर उडवून टाकू… अबू आझमींना धमकीचा फोन

मुंबई : औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी (Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आझमींच्या पीएला हा धमकीचा फोन आला. अबू आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार, असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर शासक नसल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजपने जितेंद्र आव्हाड यांना घेरले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

आझमी यांच्या पीएला अज्ञात इसमाने फोन करून आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आझमी यांना शिवीगाळही केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा हा फोन आल्यानंतर लगेच कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तक्रार मिळाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी भादंवि कलम 506 (2) आणि 504 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

कुलाब पोलिसांनी सांगितले, की बुधवारी (दि.18) राेजी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. आझमी यांच्या पीएला फोन करून अज्ञात इसमाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आली. अज्ञात इसमाचा शोध घेतला जात आहे.

धमकी कुठून आली तसेच यामागे कोण आहे, याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या धमकीप्रकरणी अबू असीम आझमी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube