‘मोदींना फोन कर तरच बुलेटवरून खाली उतरेन’; महिलेची वाहतूक पोलिसांना दादागिरी

‘मोदींना फोन कर तरच बुलेटवरून खाली उतरेन’; महिलेची वाहतूक पोलिसांना दादागिरी

Mumbai News : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक पोलिसांबरोबर एक महिला बुलेटस्वार हुज्जत घालत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला चालक पोलिसांनाच धमकावत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते. वांद्रे वरळी सी लिंकवर चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. तरीदेखील ही महिला येथे बुलेट घेऊन आली होती. त्यामुळे येथे असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी तिला अडवले. त्यावेळी ही महिला पोलिसांशीच वाद करू लागली. इतकेच नाहीतर पोलिसांना शिवीगाळ करत हात पाय तोडण्याचीही भाषा केली. मी रोड टॅक्स भरते. या रस्त्यावर चालण्याचा मला हक्क आहे. पंतप्रधान मोदींना फोन करायला सांगा तरच मी येथून जाईन अशी धमकीही या महिलेने पोलिसांना दिली.

उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिला नसता तर.. आमदारांच्या अपात्रतेवर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

वांद्रे वरळी सी लिंकवर ही महिला हेल्मेट न घालताच जात होती. वाहतूक पोलिसांनी तिला अडवले. मात्र, तिने येथे चांगलाच धिंगाणा घातला. विनंती केल्यानंतरही महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. या प्रकारामुळे येथील वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मुंबई वाहतूक पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनीही मग कारवाई करत या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच तिची बुलेटही पोलिसांनी जप्त केली.

ज्यावेळी या महिलेला पोलिसांनी रोखले तेव्हा ती चांगलीच संतापली. तिने रस्त्याच्या मध्येच बुलेट उभी केली. तुम्ही मला का अडवलं असा उलटा सवाल तिने पोलिसांना केला. मला थांबवण्याचे कारण काय, तुम्ही मला कसे अडवू शकता असे सवाल करत आता येथून मी जाणारच नाही. बुलेटवरूनही उतरणार नाही. मी गव्हर्नमेंट ऑफ भारत आहे. मी मध्य प्रदेशची आहे. मी आर्किटेक्ट आहे. स्वतःच्या ऑफिसला चालले आहे. मला रोखायची तुझी हिंमत नाही, अशा शब्दांत पोलिसांनाच तिने सुनावले. महिला काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने अखेर पोलिसांनी या महिलेची दुचाकी जप्त करत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Road Accident : भीषण अपघात ! खासगी बस पुलाखाली कोसळली; 25 जण जखमी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube