पचास खोका बोलतेही तुम…; जितेंद्र आव्हाडांची शिंदे-फडणवीस सरकारवर कविता
Jitendra Awhad On State Govt : मुंबईमधील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विविध नेते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी आमदार आव्हाड यांनी पन्नास खोक्यांवर एक कविता केली.
Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार
परवा तेरवा मुंबईतलं दोन पोरं, पुण्यातल्या दोन पोरांनी रॅप सॉंग लिहिली, त्यांना सरकारनं जेलमध्ये टाकलं. त्याच्यावर मी आपली छोटीशी कविता केली आहे. ती यावेळी जितेंद्र आव्हाडांनी वाचून दाखवली.
अरे पचास खोका, अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया? अरे पचास खोका.. अरे पचास खोका, अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया? अरे पचास खोका.. लडके ने उसको गले पे लाया तो पुलीस ने उसको जेल दिखाया.. अरे पचास खोका. अरे पचास खोका, अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया? अरे पचास खोका बोलते ही तुम क्यो चिडते हो…
अरे पचास खोका बोलते ही तुम क्यो चिडते हो… अपनाही रिश्ता पचास खोकेसे क्यों जोडते हो… अरे तुम्हाला काय वाटतं पन्नास खोक्यांचं? तुमचं काय नाव आहे का पन्नास खोके? अरे तुम्ही तुमच्या नावाला ते चिकटून घेतलंय. आणि ते पन्नास खोके मराठी मनाला असे टोचण्या देत आहेत की, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती.
महाराष्ट्राची संस्कृती सुसंस्कृत होती संस्कारीत होती आणि यांनी ही संस्कृती बाजूला काढली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची अंत्ययात्रा काढली अशी घणाघाती टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.