मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला

मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला

मुंबई – जनता नगर येथील ताडदेव (Taddeo Police) परिसरात एका इमारतीत 30 ते 40 अज्ञातांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांवर तलवारी आणि चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात तीनपैकी दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. हा हल्ला का झाला आणि कोणाच्या सांगण्यावरून झाला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Devendra Fadnavis ; महात्मा गांधींच्या सुचनेवरुन सावरकरांनी ‘ते’ पत्र लिहिले

मुंबईच्या (Mumbai Crime) ताडदेव भागात सोमवारी धक्कादायक घटना घडली. ताडदेवच्या जनता नगरमधील एका बिल्डिंगमध्ये 30 ते 40 अज्ञात लोकांनी तलवारी आणि चॉपर्स घेऊन प्रवेश केला. त्या बिल्डिंमध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांपैकी दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताडदेव परिसरातील जनता नगर भागात असणाऱ्या इमारतीच्या आवारात 30 ते 40 अज्ञात लोक अचानक आले. त्यानंतर त्या इमारतीत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जणांवर त्यांनी हल्ला केला. हल्ला करण्यामागील कारण अद्याप कळलेलं नाही. पण तिघांपैकी दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

हल्लेखोरांकडे तलवारी, चॉपर आणि बांबू होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेच्या तीन जणांवर हल्ला केला. त्यामुळे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube