Devendra Fadnavis ; महात्मा गांधींच्या सुचनेवरुन सावरकरांनी ‘ते’ पत्र लिहिले

Devendra Fadnavis ; महात्मा गांधींच्या सुचनेवरुन सावरकरांनी ‘ते’ पत्र लिहिले

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर (SwatantraVeer Savarkar) यांच्या सन्मानार्थ भाजपने राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. काल मुंबईत या यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरुन राहुल गांधींवर जोरदार टीका केली. सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या त्या पत्राबद्दल मोठा दावा केला आहे. सावरकरांना इंग्रजांनी माफी दिली हे चुकीची असून महात्मा गांधींच्या सुचनेवरुनच ते पत्र लिहिलं असल्याचे फडणवीसांनी सांगितलं.

सावरकर गौरव यात्रेत उपस्थित लोकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तुम्ही म्हणालात की वीर सावरकरांनी माफी मागितली आणि ब्रिटिशांना पत्र लिहिले. नाही, हे चुकीचे आहे. इंग्रज आपली सुटका करणार नाहीत हे माहीत असल्यामुळे सावरकरांनी पत्र लिहिले. म्हणूनच त्यांनी लिहिले – मला सोडू नका परंतु ज्यांनी तुमच्या (ब्रिटिश) विरोधात काहीही केले नाही अशा कैद्यांना सोडा.

फडणवीस पुढे म्हणाले, “महात्मा गांधींनी त्यांच्या (सावरकर) सोबत अनेक वर्षे तुरुंगात असलेल्या नातेवाईकांना पत्र लिहून इतर कैद्यांची सुटका झाल्याचे सांगितले होते. मग त्यांनी सावरकरांना सांगितले की, तुम्हीही इंग्रजांना सांगा की त्यांना (इतर कैद्यांना) सोडा, मलाही सोडा.

उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या सावरकरांच्या वक्तव्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने वीर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. राहुल गांधी यांनी अलीकडेच संसद सदस्यत्व गमावल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सावरकरांवर भाष्य केले होते. 25 मार्च रोजी राहुल गांधींना विचारण्यात आले की, मानहानीच्या प्रकरणात न्यायालयात माफी मागणार का? त्यावर राहुल म्हणाले, मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube